सामाजिक

कोणी रस्ता देता का रस्ता..! देडगाव ते डोरजळगाव व अतिक्रमण रोड मार्ग रस्त्याचे अतिक्रमण करून बंद केले वाहनचालकांना करावी लागते कसरत,शेतकरी वैतागले

नेवासा दि. 27 जानेवारी (प्रतिनिधी )
नेवासा तालुक्यातील देडगाव येथील देडगाव ते डोरजळगाव या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असुन लोकप्रतिनिधिंनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करूनही रस्ता न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचे साधन शेती असल्यामुळे मोठी कसरत करत या रस्त्यावरून त्यांना दररोज ये-जा करावी लागत आहे.
पावसाळ्यात चिखलामुळे छोटे मोठे अपघात होतात.
प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत, त्यामुळे हा रस्ता कधी दुरूस्त होतो? यांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तसेच लोकप्रतिनिधी, पुढारी,नेते, याबाबत काय कारवाही करणार की फक्त तेरी भी चूप मेरी भी चुप अशीच अवस्था या रस्त्याबाबत नागरीकांना पाहायला मिळत आहे.व संबंधित कंत्राटदार काम करतांना बरेच वेळा असे दिसते की निकृष्ट कामे करतात लोकप्रतिनिधींना यातील काही टक्के वारी पोहच होत,असल्याने या विषयी ब्र शब्द कोणी काढत नाही.
याबाबत देडगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेकदा ठराव करण्यात आले,माञ याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली,ग्रामपंचायमध्ये विचारणा केली असता संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात,माञ कोणत्याही प्रकारची दखल लोकप्रतिनिधी कडून घेतली जात नसल्याने,चित्र एकंदरीत दिसत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे