अहमदनगर :३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली. सुजय विखे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीच्या माध्यमातून सुजय विखे यांच्याकडून अहमदनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप, सुरेशभाऊ बनसोडे, सुहास शिरसाठ,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाअध्यक्ष सुमेध गायकवाड, विशाल गायकवाड, जेष्ठ नेते नितीन कसबेकर, महेश भोसले,अनिकेत विधाते, महिला जिल्हाप्रमुख गौतमी भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, मीरा गवळी त्याच प्रमाणे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा