प्रशासकिय

क्रीडा पुरस्कारासाठी २२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

अहमदनगर दि. ११ जानेवारी (प्रतिनिधी ):- क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर २२ जानेवारी, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे