अहमदनगर दि. 8 जानेवारी (प्रतिनिधी)- नगर जामखेड महामार्गावरील जीव घेणे खड्डे तातडीने बुजवण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अभियंता यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत दीपक गुगळे, अमित गांधी, शहानवाज शेख, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की नगर जामखेड हा राष्ट्रीय महामार्ग 561 असून, जामखेड नाका – निंबोडी ते आठवड या नगर जिल्हा हद्दीपर्यंत काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे.
त्यामुळे या खड्ड्यांमुळे वाहन चालक पडून अनेक निष्पाप व्यक्तींना अपघातांना सामोरे जावे लागत आहे व अनेक जण मृत्युमुखी देखील पडलेले आहे. त्यामुळे उपविभागीय अभियंता यांनी स्वतः लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत .अन्यथा येणाऱ्या १५ दिवसा नतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा