न्यायालयीन

विदयार्थ्यास शिक्षकाकडून मारहान प्रकरणी शिक्षकाची न्यायालयात निर्दोष मुक्तता!

राहुरी दि. 8 जानेवारी (प्रतिनिधी )
कोळेवाडी येथील प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांला शाळेतील शिक्षकाने मारहान केले. प्रकरनी शिक्षकाची नुकतीच राहूरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सविस्तर हकिकत असी की राहूरी तालूक्या तिल कोळेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे सदर प्राथमिक शाळे मध्ये दि .२२ / ८ / २३ रोजी शाळा चालू असताना दुपारले सत्रामध्ये फिर्यादी विदयार्थी हा हसलेचा राग आला म्हनुन व तो शांत बसावा म्हनून आरोपी शिक्षक नामे संजय कपिलेश्वर वायाळ वय – ५ ३ वर्ष याने त्यास मारहाण केल्यास त्याचे जिवितास धोका निर्मान होउ शकतो हे माहित असताना सुद्धा त्याने त्यास बुक्कीने पाठीत मारहान केली हाताने उजव्या गालावर बोचकरे घेतले तसेच डोके भिंतीवर आपटविले.व तू तुझ्या पप्पाला घेउन आला तरी त्यांचे समोर तूला मारील असी धमकी दिली. या वरून फिर्यादी विदयार्थी याने राहूरी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली व त्यास F.I.R. No Il 971/2023 असा क्रमांक पडला व भा.द.वि.कलम 323 ,337 व506प्रमाने गुन्हा दाखल केला पोलिसांनी सदर गुन्हयाचा तपास करुन दोषारोप पत्र मे.न्यायालयात पाठवून दिले त्यास न्यायालयात S. S.C. No 1362/23 असा क्रमांक पडला. सदर खटला हा मा.न्यायमुर्ती आर. एस. तपाडिया साहेब यांचे समोर चालला व सदर खटल्यात साक्षिदार तपासले गेले व दि.6/1/2024 रोजी सबळ पुराव्या अभावी मा.न्यायमुर्ती यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली सदर खटल्यात आरोपी चे वतीने जेस्ट विधीज्ञ व नोटरी पब्लिक अँड. पी.एम. संसारे यांनी काम बघितले सदर खटल्याकडे , शिक्षक पालकवर्गासह सर्व तालूक्याचे लक्ष लागले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे