राजकिय

प्रभाग क्रमांक 15 चा सर्वांगीण विकास, जनतेची निरंतर सेवा हेच शिवसेनेचे वचन: अनिल शिंदे शिवसेना (शिंदे गट) पक्ष नसून ते एक कुटुंब आहे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि. 9 जानेवारी: अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे.
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार अनु जाती अनु. क्रमांक 4 प्रियंका परसराम गायकवाड, नागरिकांचा मागास प्रवर्ग अनु क्रमांक 2 सुवर्णा दत्ता जाधव, सर्वसाधारण महिला अनु क्रमांक 2 विद्या दिपक खैरे, अनु. क्रमांक 2 सर्वसाधारण अनिल माधवराव शिंदे हे निवडूकीच्या आखड्यात उतरले आहेत.
शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हा अध्यक्ष उमेदवार अनिल शिंदे यांच्याशी देशस्तंभ न्यूजने संवाद साधला.यावेळी ते म्हणाले शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनहिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला शिवसेना शिंदे गट हा पक्ष वाटत नसून ते एक कुटुंबच वाटत आहे.
प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना (शिंदे ) गटाचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रभाग क्रमांक 15 चा सर्वांगीण विकास व सर्व सामान्य जनतेची निरंतर सेवा हेच आमचे वचन असून, शिवसेना (शिंदे) गट हा पक्ष नसून ते सर्व सामान्य माणसाच्या प्रगतीचा, हितासाठी झटणारे एक कुटूंब आहे.
अहिल्यानगर शहरातील प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे शिंदे सेनेचा झेंडा अहिल्यानगर महानगर पालिकेवर फडकेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे