श्रीमती मंगलताई घोडके-भाकरे राज्यस्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील अंगणवाडी सेविका श्रीमती मंगलताई घोडके-भाकरे यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका सेवा गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय लहुजी सेनेच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूर येथे झालेल्या राज्य स्तरीय पुरस्कार वितरण सोहळयात सदरचा पुरस्कार अंगणवाडी सेविका श्रीमती मंगलताई भाकरे यांना भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, सौ.स्वातीताई बागुल,राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित बरहाळेकर,कायदेशीर सल्लागार अँड.रमेश कोळेकर,राज्य प्रमुख सुरेश आढागळे,युवा आघाडी प्रमुख शुभम बागुल,जिल्हा प्रमुख रज्याकभाई शेख,जिल्हा कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे,महिला आघाडी प्रमुख श्रीमती ज्योतीताई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
निष्काम भावनेने सेवा कार्य करणाऱ्या श्रीमती मंगलताई भाकरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुधीर चव्हाण,तालुका होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे,अंगणवाडी मदतनीस कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मन्नाबी शेख,सौ.हिराताई देशमुख, कावेरी मापारी,नंदाताई उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.