प्रशासकिय
अहमदनगर व नेवासा तालुक्याच्या 129 गावातील रिक्त पोलीस पाटील पदाच्या समांतर आरक्षणासाठी 7 डिसेंबर रोजी सोडत

अहमदनगर दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी ) :- अहमदनगर उपविभागातील अहमदनगर व नेवासा तालुक्यातील 129 गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता प्रचलित शासन तरतुदीनुसार, प्रवर्गनिहाय आरक्षण निधीत करावयाची असुन त्याअंतर्गत समांतर आरक्षण तसेच महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी 7 डिसेंबर, 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर या ठिकाणी सभेचे आयोजन केलेले आहे. सर्व संबंधित गावांतील नागरीकांनी आरक्षण सोडतेवेळी उपस्थित रहावे. एखादया गावातील नागरीक आरक्षण सोडतेवेळी उपस्थित राहिले नसल्यास व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे आरक्षणसोडत करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी,असे उपविभागीय दंडाधिकारी अहमदनगर भाग, अहमदनगर सुधीर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.