प्रशासकिय
18 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

अहमदनगर दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी ):- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे दर महिन्याच्या तिसऱ्या आयोजन करण्यात येते. त्यानुसार 18 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये संबंधितांनी विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतीमध्ये करावा. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह लोकशाही दिनाच्या अगोदर पाठविणे आवश्यक आहे. महिला लोकशाही दिनास मुळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.