न्यू आर्टस् महाविद्यालयात नवमतदार नोंदणीला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर दि. 23 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) :- जिल्हाधिकारी कार्यालय ,सहमतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, अहमदनगर,आणि वर्शीप अर्थ फाऊंडेशन यांच्या सयूंक्त विद्यमाने न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात कला,वाणिज्य विज्ञान व एच. एस.सी.व्होकेशनल शाखेतील 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा 01जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदार विद्यार्थ्यांचा मतदार नावनोंदणी कॅम्प संपन्न झाला. या कँपला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. . नाव नोंदणीची अंतिम तारिख ९ डिसेंबर, 2023 अशी असुन जास्तीत जास्त युवक- युवतीनी यामध्ये भाग घेऊन आपली नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास तहसिलदार संजय शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.कल्पना दारकुंडे,पर्यवेक्षक प्रा.सुभाष गोरे, नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय नकुलवाड,प्रा.सुधाकर काळे,प्रा.भरत कराळे, प्रा.नारायण गायकवाड, सचिन कांबळे, जिल्हा समन्वयक, सागर भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अधिकाधिक मतदारांची नाव नोंदणी करावी. ज्या महाविद्यालयाची मतदार नोंदणी अधिक होईल त्या महाविद्यालयांना बक्षिसे तसेच प्रमाण पत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला,पासपोर्ट फोटो, आई-वडील यांचे इपीक कार्ड (मतदान कार्ड) इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागते. या कागदपत्रांच्या आधारे घरबसल्या व्होटर्स हेल्पलाईन ॲपद्वारे मतदान कार्ड काढू शकता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय नकुलवाड यांनी तर प्रा.विलासराव वाळुंजकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालय कॅम्पस ॲम्बेसिडर, वर्गप्रतिनिधी व नवमतदार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.