राजकिय

एकल शिक्षक मंच व समता मंडळाचा,सदिच्छा,बहूजन,शिक्षक संघ व साजिर आघाडीला पाठींबा!

अहमदनगर (प्रतिनिधी) सदिच्छा ,बहूजन,शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीच्या जिल्हा प्रचार कार्यालयात दि.13/10/2022 रोजी नगर जिल्हा एकल शिक्षक मंच व समता मंडळाचे जिल्हाध्यक्ष सूभाष तांबे व त्यांच्या सहकार्‍यांनी जाहीर केले.
आघाडीला पाठींबा देण्यासाठी समता मंडळाच्या पारनेर,संगमनेर व श्रीगोंदे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी ऊपस्थीत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बबनराव आढाव होते,मेळाव्यासाठी आघाडीचे नेते राजेंद्र शिंदे,उत्तरेश्वर मोहोळकर,रविंद्र पिंपळे,आबा लोंढे,एकनाथ व्यवहारे,बाळासाहेब खिलारी,बाळासाहेब साबळे,नवनाथ तोडमल,बाबा आव्हाड,बाळासाहैब देंडगे,सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,
मेळाव्यात सदिच्छा,बहुजन,शिक्षक संघ व साजीर आघाडीला पाठींबा का देण्यात आला,या विषयी बोलतांना सूभाष तांबे म्हणाले की,दोन्ही गूरुमाऊली व गूरुकूलमंडळाने बँकेचा कारभार करत असतांना सभासदांची फसवणुक केली,ही सर्व मंडळे नाते-गोते,जात,पात या पलीकडे विचार करत नाही,सभासदांचे शोषण करतांना एकल शिक्षकांवर सातत्याने त्यांनी अन्याय केला आहे.एकल समता मंडळाला कमी लेखुन कार्यकर्त्यांची कुचंबना करण्याचा व मानसिक खच्चिकरण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.यापुढील काळात हा अन्याय एकल शिक्षक सहन करणार नसल्याचा इशारा समता मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुभाष तांबे व मोहन लांडगे यांनी दिला आहे.
उद्याच्या होणार्‍या निवडणुकीत एकल समता मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सभासद सदिच्छा,बहूजन,शिक्षक संघ व साजिर महिल आघाडीला मतदान करणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे