कोल्हार दि. 8 मार्च (प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील कोल्हार बु येथे महसूल विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब लोखंडे सह अनेक कुटूंबिय तलाठी कार्यालयासमोर ४ मार्च पासून उपोषणास बसले होते. दिनांक ६ मार्चला युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे पाटील,
जिल्हाध्यक्ष महेश भोसले, सचिव बाळकृष्ण भोसले, उपाध्यक्ष उमेश साठे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देत समस्या जाणून घेतल्या.
प्रशासनासही धारेवर धरत या नागरिकांना न्याय देण्याविषयी धारेवर धरले. शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेत आज ७ मार्चला उपोषण सोडवले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा