घरफोडी करणारी सराईत आरोपींची टोळी 2,53,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थनिक गुन्हे शाखेने केली गजाआड

अहमदनगर दि.25 सप्टेंबर (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 05/09/23 रोजी फिर्यादी श्री. दादासाहेब गंगाराम शेळके वय 38, रा. उक्कडगांव ता. नगर यांचे घराचा दरवाजा अनोळखी आरोपींनी कशानेतरी उघडुन, आत प्रवेश करुन लोखंडी कपाटात ठेवलेले 40,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे घरफोडी चोरी करुन घेवुन गेले होते. सदर बाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 681/2023 भादविक 454, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/हेमंत थोरात, पोहेकॉ/बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, पोकॉ/रोहित येमुल, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमण घरफोडीचे ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने नगर तालुका व पारनेर परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी शाहरुक काळे रा. रांजनगांव मशिद, ता. पारनेर हा त्याचे साथीदारासह चोरीचे सोने विक्री करण्यासाठी सोनारगल्ली, सुपा येथे येणार आहे, आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन केले. पथकाने लागलीच सोनार गल्ली, सुपा येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे तीन संशयीत इसम पथकास दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) शाहरुख आरकस काळे वय 25, रा. रांजनगांव मशिद, ता. पारनेर, 2) राजेश अशोक काळे वय 20, रा. धाडगेवाडी, ता. पारनेर व 3) ऋषी अशोक काळे वय 20, रा. रांजनगांव मशिद, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत सोन्याचांदीचे दागिने मिळुन आले. सदर सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत अधिक चौकशी करता त्यांनी पारनेर, बेलवंडी, मिरजगांव व नगर तालुका परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलो असल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार आरोपी 3) राम अशोक काळे रा. धाडगेवाडी, ता. पारनेर (फरार) यांचे सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे घरफोडीचे एकुण – 04 गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. नगर तालुका गु.र.नं. 681/23 भादविक 457, 380
2. मिरजगांव गु.र.नं. 302/23 भादविक 457, 380
3. पारनेर गु.र.नं. 889/23 भादविक 457, 380
4. बेलवंडी गु.र.नं. 345/23 भादविक 457, 380
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 2,53,000/- हजार रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचांदीचे दागिने मिळुन आल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचा फरार साथीदार नामे राम अशोक काळे रा. धाडगेवाडी, ता. पारनेर याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
आरोपी शाहरुक आरकास काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, गंभीर दुखापत करुन जबरी चोरी, घरफोडी व दुखापत करणे असे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पारनेर 75/2015 भादविक 326, 504, 506, 143, आर्म ऍ़क्ट 4/25
2. श्रीगोंदा 596/2017 भादविक 457, 380
3. श्रीगोंदा 671/2017 भादविक 395, 504, 506
4. श्रीगोंदा 439/2017 भादविक 397, 459
5. मंचर, जिल्हा पुणे 345/2017 भादविक 397, 394, 457, 380, 427, 34
आरोपी राजेश अशोक काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. बेलवंडी 138/2020 भादविक 394, 379, 34
2. बेलवंडी 172/2021 भादविक 379, 34
3. बेलवंडी 409/2022 भादविक 399, 402 आर्म ऍ़क्ट 4/25
आरोपी ऋष्ज्ञी ऊर्फ ऋषण अशोक काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, पुणे व ठाणे जिल्ह्यात खुनासह दरोडा, दरोडा व जबरी चोरी असे एकुण -03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. आळेफाटा, जिल्हा पुणे 89/2016 भादविक 395, 396, 454, 457, 380, 377
2. हिल लाईन, जिल्हा ठाणे 222/2016 भादविक 302, 394, 396, 397, 452, 201, 427
3. बेलवंडी 184/2022 भादविक 394, 34
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले साहेब, उविपोअ, नगर ग्रामिण विभाग, व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उविपोअ, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.