पालकांनी आपल्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा – मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल मध्ये पालकांसाठी मोदक स्पर्धा

नगर दि.25 सप्टेंबर (प्रतिनिधी )- प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये विदयार्थ्यांच्या महिला पालकांसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते या वेळी विजेत्यांना मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांचे हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्ह्णून सौ गीता सातपुते व सौ. लीना सोन्नीस उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणेश स्थापने निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वेळी मोदक स्पर्धे मध्ये एकूण 40 महिला पालकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. अश्विनी काळे, द्वितीय क्रमांक सौ. शितल वैराळ तृतीय क्रमांक सौ. राजश्री टीपरे व उत्तेजनार्थ सौ. सुनीता सातपुते असे चार बक्षीस देण्यात आले व सहभागी महिलांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वेळी उपस्थित असलेल्या सर्व पालकांना सहजयोग ध्यान साधने बाबत माहिती देऊन कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम ही सहजयोग परिवाराच्या वतीने घेण्यात आला. या वेळी अनेक महिलांना थंड चैतन्याची अनुभूती ही प्राप्त झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता गांगर्डे यांनी केले, स्वागत सौ. दीपाली हजारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. आरती हिवारकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे कोशाध्यक्ष संदीप गांगर्डे, वैष्णवी नजन व डान्स टीचर शुभम भालदंड सर यांनी परिश्रम घेतले.