निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून नगरजिल्ह्यात संघटनबांधणी

अहमदनगर दि.21 (सप्टेंबर )- आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे नगर शहरातील जालीदंर साळवे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहमदनगर जिल्हा नियुक्ती व आढावा बैठक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बुधवार दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी १. वाजता संपन्न झाली.यावेळी अनेकांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.पक्षाचे ध्येय व धोरणे याबाबत कार्य कर्त्यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष दिपकभैय्या गरुड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुढील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. कर्जत तालुका अध्यक्षपदी नवनाथ साळवे,आष्टी युवा तालुका अध्यक्षपदी,अविनाश निकाळजे यांची तर पिंपळगाव ऊजैनी शाखाअध्यक्ष पदी,सुरज आल्हाट,शेंडीगाव शाखाअध्यक्षपदी नंदु वाकडे यांची नियुक्ती केली आहे.
यावेळी स्वाभिमानी चे जिल्हा अध्यक्ष नाथा भाऊ आल्हाट,नगर तालुका अध्यक्ष,संदिप भिंगारदिवे,आष्टी तालुका अध्यक्ष,दिपक गरूड,पाटोदा तालुका अध्यक्ष,प्रविन थोरात,आष्टी युवा तालुका अध्यक्ष,अविनाश निकाळजे,उपअध्यक्ष,दिपक गायकवाड
पिंपळगावचे ग्रामपंचात सदस्य एस.राहुल आल्हाट (S.R.P),नितिन शिरसाठ ,आनंद आल्हाट,कुंदन आल्हाट
आदी उपस्थित होते.आगामी लोकसभा व विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून नगरजिल्ह्यात संघटनात्मक बांधणीत गेल्या काही महिन्यांपासून जोर धरला असून राज्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षप्रमुख रमेशभाऊ साळवे यांनी पक्षीय पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर व बीड जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे कार्य जोरदार सुरू आहे.
यावेळी नाथाभाऊ आल्हाट यांनी मराठा अरक्षणास व धनगर अरक्षणास आमच्या पक्षाचा संपूर्ण पांठिंबा आहे. तसेच हा आरक्षणाचा विषय सरकारने त्वरित मार्गीलालावा अशी मागणी केली. तसेच अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेकडे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी दुष्काळ जाहीर न केल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा त्यांनी यावेळी शासनाला दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की
अहमदनगर जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस न पडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पिकांची अवस्था वाईट झाली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने अहमदनगर जिल्ह्याकडे पाठ फिरवली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.अहमदनगरमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे खरीप हंगामातील पिकं पूर्णतः करपली असून जवळपास दीड ते दोन महिन्यापासून पावसाचा थेंबही पडला नाही.जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चाऱ्याच्या छावण्या उभारून पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली याविषयी लेखी निवेदन शासनाला लवकरच देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही असे चित्र दिसत असून गोरगरीब ओ.बी.सी,दलित, मागासवर्गीय ,भटके अशा आधीच पीडित समुदयाला गावगुंड त्रास देत असुन अशा गावगुंडांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी लक्ष घालावे तसेच या गोरगरिबांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये माणूस म्हणून वागणूक द्यावी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला ऐकून घेऊन त्यांची फिर्याद नोंद करावी परंतु असे न करणाऱ्या पोलिसांवर पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.