2 दिवसातच 7 गुन्ह्यातील फरार आरोपीना ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या

अहमदनगर दि. १२ सप्टेंबर (प्रतिनिधी) 2 दिवसातच 7 गुन्ह्यातील फरार आरोपीना बेड्या ठोकन्यात स्थानिक गुन्हे शाखेने यश आले आहे.
मा. श्री. राकेश आलो साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/हेमंत थोरात, सफौ/बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/विश्वास बेरड, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले, विशाल दळवी, फुरकान शेख, पोकॉ/सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन रवाना केल्याने पथकाने केलेली कारवाई खालील प्रमाणे –
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गंभीर गुन्ह्यातील ताब्यात घेतले फरार आरोपी खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन व गु.र.नं. व कलम अटक आरोपी
1. कोपरगांव शहर गु.र.नं. 93/07 भादविक 395, 397 1) सुरेश फकट्या चव्हाण, रा. गुंडेगांव, ता. नगर
2. कोपरगांव शहर गु.र.नं. 207/12 भादविक 379 1) सोमनाथ बाळु मोरे रा. शिरसगांव, ता. श्रीरामपूर
3. कोपरगांव शहर गु.र.नं. 23/12 भादविक 379 विज अधिनियम क. 136, 139 1) सोमनाथ बाळु मोरे रा. शिरसगांव, ता. श्रीरामपूर
4. कोपरगांव शहर गु.र.नं. 25/12 भादविक 379 1) सोमनाथ बाळु मोरे रा. शिरसगांव, ता. श्रीरामपूर
5. कोपरगांव शहर गु.र.नं. 279/12 भादविक 379, 34 1) गोविंद आण्णा गायकवाड रा. उंबरगांव, ता. श्रीरामपूर
6. कोपरगांव तालुका गु.र.नं. 101/17 भादविक 399, 402 1) नामदेव बडोद भोसले रा. पढेगांव, ता. कोपरगांव हल्ली बुरुडगांव रोड, ता. नगर
7. राहाता गु.र.नं. 397/23 भादविक 307 1) संपत ऊर्फ संप्या शंकर वायकर रा. पुणतांबा, ता. राहाता
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अभिलेखावरील सन 2007 मधील दरोडा -1, सन 2012 मधील चोरी -4, सन 2017 मधील दरोडा तयारी -1 व सन 2023 मधील खुनाचा प्रयत्न -1 असे गंभीर स्वरुपाच्या एकुण -07 गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता संबंधीत पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.