विद्रोही विद्यार्थी संघटनेने पद्मश्री, बीजमाता राहीआई पोपेरे यांच्या अपमानाचा निषेध व्यक्त करत संगमनेर प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन!

संगमनेर दि.७ जानेवारी (प्रतिनिधी)
विद्रोही विद्यार्थी संघटनेने पद्मश्री, बीजमाता राहीआई पोपेरे यांच्या झालेल्या अपमानाचा निषेध व्यक्त करून संगमनेर प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. चेतन कांबळे, प्रवीण कोंडार, नामदेव धराडे इत्यादी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
निवेदन असे म्हटले आहे की, इंडियन सायन्स काँग्रेस अंतर्गत फार्मर्स सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. बीज माता’ म्हणून ओळखल्या ‘पद्मश्री’ विजेत्या राहीबाई पोपेरे यांना महिला विज्ञान कॉंग्रेसच्या उद्घाटन सत्रात अचानक भाषण आटोपते घेण्यास सांगण्यात आले. राहीबाईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही नेत्यांवर टीका केल्याने ‘बीजमाते’ला थांबवण्यात आलं.
आपल्या गावाला भेट देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या वचनाची आठवण पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले करुन दिली. जिल्ह्यातील कोंभळणे या गरीब परिस्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली होती, असं राहीबाईंनी सांगितलं. मंचावर सेंट्रल इनलैंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्युट, कोलकाताचे संचालक डॉ. बसंतकुमार दास, माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता प्रकाश कडू, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती.
बिजमाता राहिआई पोपेरे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटकिया भाषण सुरू असताना संयोजकांनी मंचावर येऊन माईकचे बटण बंद केले. हा बिजमता, पद्मश्री राही आई पोपरे यांचा अपमान आहे. हा अपमान पद्मश्री अपमान आहे. आदिवासी अपमान आहे. म्हणून आम्ही विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना आणि महिला विज्ञान कॉंग्रेसच्या संयोजकांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत.