कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी समाजमंदीरात अभ्यासिका केंद्र सुरू करावे – भास्कर भैलुमे

कर्जत (प्रतिनिधी) : दि १२ मे
कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज मंदिराचे रूपांतर विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका केंद्र, वाचनालय किंवा बुध्द विहारात करण्याचे आवाहन कर्जत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती भास्कर भैलुमे यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याना केली आहे.
आजची सामजिक परिस्थिती पाहता विभक्त कुटुंब पद्धती किवा एकत्र कुटुंब पध्दतीमुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी सोई सुविधा उपलब्ध होत नाही. याचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम दिसून येत आहे. संपुर्ण तालुक्याची पाहणी आणि सर्व्हे केल्यानंतर याच गोष्टी निदर्शनास आल्या. यावर विचारमंथन करीत असताना लक्षात आले की, प्रत्येक गावात समाज मंदिर बांधले गेले आहे. त्या ठिकाणी समाज मंदिराचे रूपांतर विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका केंद्र, वाचनालय अथवा बुध्द विहारात करणे गरजेचं आहे. जेणेकरून समाजातील ज्या मुलांना घरी अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत त्या मुलांना या अभ्यासिका केंद्रामध्ये अभ्यास करता येईल अशी इच्छा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना भास्कर भैलुमे यांनी केली आहे. यासह यासर्व ठिकाणी विविध प्रशासकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यासाठी चर्चासत्र, मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडावा यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे. समाजातील युवकांनी प्रशासनातील मानाच्या व मोक्याच्या जागा पटकाविल्या पाहिजेत. हे महामानवाचे स्वप्न साकार करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध जयंतीच्यानिमित्ताने आपण प्रत्येक गावातील समाज मंदिराचे रूपांतर अभ्यासिका केंद्र सुरू करून तथागताला अभिवादन करीत वरील संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना भैलुमे यांनी केले आहे. यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी समाजबांधवाना दिली आहे.