सामाजिक

राहुरीत ०१ सप्टेंबर रोजी बहुजन, अल्पसंख्यांक, वंचितांची जनआक्रोश सभा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

अहमदनगर : दि.३० ऑगस्ट (प्रतिनिधी) दलित,मुस्लिम,ओबीसी,आदिवासी,भटके विमुक्त आणि इतर अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीची शुक्रवार दि. ०१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १:०० वाजता राहुरी शहरात जुना सरकारी दवाखाना, नवीपेठ, येथे ‘बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश सभा’ ॲड.प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होत आहे.यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण,दिशा शेख,फारुख अहमद,ॲड.अरुण जाधव,शरद खरात आणि इतर समाजाचे प्रतिनिधी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे दलित समूहाच्या युवकांना अमानुष मारहाण प्रकरणी ॲड.प्रकाश आंबेडकर पीडितां सह कुटुंबीयांची भेट घेणार आहे.तसेच ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन अल्पसंख्यांक सभेला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.सभेला येणाऱ्या लोक आणि कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची,अत्यावश्यक सेवा व्यवस्था करण्यात केली आहे, तसेच पार्किंग व्यवस्था शहरा लगत असलेल्या मोकळ्या पटांगणात करण्यात आली आहे.सभेला परवानगी देण्यात आली असून कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे.जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,प्रतीक बारसे सभेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये,कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेत आहे अशी माहिती जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी सांगितले आहे.सभेचे समन्वय समितीचे प्रतिनिधी सह जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,नंदू गाडे,चंद्रकांत जाधव,अनिल जाधव,मारुती पाटोळे,रविकिरण जाधव,रवींद्र पवार,चरण त्रिभुवन,प्यारेलाल शेख,रवींद्र म्हस्के,अतिश पारवे,पोपट शेटे,संतोष जौंजाळ,संतोष चोळके,प्रवीण ओरे,जोसेफ शिरसाठ,गणेश राऊत,युवा आघाडीचे अप्पासाहेब मकासरे,प्रसाद भिवसने,सागर ढगे,देविदास भालेराव,किरण पाटोळे,विनोद गायकवाड अहोरात्र मेहनत करून सभा यशस्वी करण्यासाठी झटत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे