प्रवाशांच्या बॅगेतील व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

अहमदनगर (प्रतिनिधी) प्रवाशांच्या बॅगेतील व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्रीमती. गायत्री नामदेव जव्हादे वय 36, रा. वाकडी, ता. नेवासा या दिनांक 23/06/23 रोजी पैठण येथे जाण्यासाठी शेवगांव बस स्टॅण्ड येथे थांबलेल्या असताना त्यांचे बॅगेतील 16000/- रुपये किंमतीचे सोन्याचे झुंबर व रोख रक्कम अनोळखी चोरट्याने चोरुन नेले होते. सदर घटने बाबत शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 555/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक
राकेश ओला यांनी पोनि. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना ना उघड चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, शदर बुधवंत, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, विजय ठोंबरे, पोकॉ/जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोकॉ/सोनाली साठे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तारकपुर बस स्थानका जवळ एक महिला हिरव्या रंगाची साडी व हातात लाल रंगाची बॅग घेवुन संशयीतरित्या उभी असुन बसमध्ये चढणा-या प्रवाशांच्या बॅगेमधुन तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने तारकपुर बस स्टॅण्डवर जावुन खात्री करता नमुद वर्णना प्रमाणे एक महिला मिळुन आली. तिस पोलीस पथकाची ओळख सांगुन तिचे नाव गांव विचारले असता तिने तिचे नाव 1) उर्मिला नवनाथ काळे वय 58, रा. वाकी, ता. आष्टी, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले. तिची पंचासमक्ष अंगझडती घेता तिचे बॅगमध्ये तुटलेले सोन्याचे झुंबर मिळुन आले त्याबाबत विचारपुस करता तिने दोन महिन्यापुर्वी शेवगांव बस स्टॅण्ड येथुन एक महिलेच्या बॅगेतुन चोरी केल्याची कबुली दिल्याने तिस मुद्देमालासह ताब्यात घेवुन शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
महिला आरोपी उर्मिला नवनाथ काळे ही सराईत गुन्हेगार असुन तिचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण – 5 गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.