शहर काँग्रेसचे “डरो मत” अभियान नगरकरांचे मनोबल वाढविणारे : माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात किरण काळेंनी घेतलेल्या पुढाकाराचे केले कौतुक

अहमदनगर २५ ऑगस्ट (प्रतिनिधी) : नगर शहरात काँग्रेस हा सर्वसामान्यांचा आवाज बनला आहे. नगरकरांच्या नागरी समस्या आणि अनुचित प्रकरां प्रसंगी मदत करण्यासाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले “डरो मत” अभियान हे नगरकरांचे मनोबल वाढविणारे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. याकामी काळेंनी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे म्हणत थोरातांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शहरात घडलेली हत्याकांडं, खुनी हल्ले, मारामाऱ्या, बेकायदेशीररित्या ताबे मारण्याचे प्रकार या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी, आ. थोरात यांच्या प्रेरणेतून काँग्रेसने “डरो मत” अभियान मागील महिन्यापासून सुरू केले आहे. २४ तास ३६५ दिवस नगरकरांसाठी काळे यांचे ९०२८७२५३६८ व ८६९८७५७०६३ हे वैयक्तिक मोबाईल क्रमांक अभियानाचा हेल्पलाईन म्हणून जाहीर केले आहेत. अन्यायग्रस्त, पीडित तसेच परिसरातील नागरी समस्यांसाठी मदतीकरीता नागरिक मोठ्या संख्येने थेट संपर्क साधत आहे. त्यांना मदत केली जात आहे. अभियानात सहभागी होण्याच्या जाहीर आवाहनाच्या भीत्तीपत्रकांचे अनावरण माजी मंत्री थोरातांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी थोरात म्हणाले, राहुल गांधींनी देशातील हुकूमशाहीला विरोध करत संविधान वाचवण्यासाठी देश पातळीवर आवाज उठविला. यातून “डरो मत”चा संदेश त्यांनी देशवासीयांना दिला. या संदेशातून प्रेरणा घेत नगर शहरातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शहर काँग्रेसने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करणारी आहे. त्यामुळेच या हेल्पलाईनवर नगरकरांकडून मोठ्या प्रमाणावर संपर्क साधला जात असून किरण काळे व्यक्तीश: नागरिकांना समस्यांतून दिलासा देण्यासाठी काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्ते यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
किरण काळे म्हणाले, शहरातल्या नागरी प्रश्नांच्या दुरावस्थेबाबत, भ्रष्टाचार, घोटाळे, दहशती विरोधात काँग्रेस लढत आहे. जनहिताची ही लढाई आगामी काळात अधिक तीव्र केली जाईल. प्रसंगी अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्याची भूमिका माझी असेल. आगामी मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी “डरो मत” अभियान जनतेपर्यंत अधिकाधिक घेऊन जावे. नवीन कार्यकर्त्यांना जोडत थेट मतदारांशी संवाद साधावा, असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, दशरथ शिंदे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, हनीफ जहागीरदार, गौरव घोरपडे, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनील भिंगारदिवे, रतिलाल भंडारी, आप्पासाहेब लांडगे, प्रशांत जाधव, किशोर कांबळे, आकाश जाधव, राहुल सावंत, उषा भगत, राणी पंडित, सुनिता भाकरे, मिनाज सय्यद, पुनम वन्नम, जरीना पठाण, आकाश आल्हाट, सोफियान रंगरेज, समीर सय्यद, आनंद जवंजाळ, राकेश वाघमारे, शंकर आव्हाड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.