गुन्हेगारी

ठाणे जिल्ह्यात दोघांवर आठ गोळ्या झाडून फरार झालेला पोलीस आरोपी कोल्हार मधून जेरबंद DySP संदिप मिटके यांच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई

अहमदनगर दि.15 ऑक्टोबर ( प्रतिनिधी): ठाणे ग्रामीण मधील पडघा पो.स्टे च्या हद्दीमध्ये दि.13/10/2023 रोजी रात्री 09:30 सुमारास मैदे गावाजवळ ता.भिवंडी येथे आरोपी नामे सुरज देवराम ढोकरे याने फिर्यादी अजिम अस्लम सय्यद आणि त्याचा आतेभाऊ फिरोज रफिक शेख यांच्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अजिम यांच्यावर 6 आणि फिरोज यांच्यावर 2 गोळ्या सरकारी ग्लॉक 19 Made in USA या पिस्तूलातुन झाडल्या. त्याबाबत पडघा पो.स्टे गुर.नं 533/23 भारतीय दंड संहिता 307, भारतीय हत्यार कायदा 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दि. 15/10 /2023 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगरकडून नाशिकच्या दिशेने जात असल्याबद्दल माहिती पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांना मिळाली. त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्याकरिता तीन पथके तयार करून कोल्हार येथे नाकाबंदी लावण्यात आली आणि आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक 19 पिस्तलसह कोल्हार बस स्टँडवरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले .सदर आरोपी हा मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालय QRT मध्ये आर्मरर या पदावर कार्यरत आहे. आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , API युवराज आठरे, PSI योगेश शिंदे,ASI बाबासाहेब लबडे,HC दिनेश चव्हाण,HC सुरेश पवार, HC एकनाथ सांगळे,HC भाऊसाहेब आव्हाड,PN रवींद्र मेढे,PN निलेश धाधवड ,PN अशोक शिंदे,PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे,PC अमोल फटांगरे चालक HC वर्पे व चालक PC ज्ञानेश्वर गांगुर्डे, होम हारदे, होम अभिजित साळवे, होम विशाल राऊत, होम गणेश साळुंके यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे