नगर दौंड रोडवरील आय पॅलेस हॉटेलमध्ये 28,150 रुपये किमतीचा देशी, विदेशी दारुचा साठा जप्त, नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई

अहमदनगर दि. २३ जुलै (प्रतिनिधी)
नमुद बातमीतील हकीकत अशी की, श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/आनंद घोडके, पोकॉ/कमलेश पाथरुट, सोमनाथ वडणे, विक्रांत भालसिंग असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अवैध दारु विक्रीवर कारवाई करणेकामी पथक तयार करुन कारवाई करणेसाठी सुचना व मार्गदर्शन केले.
सदर पथक हे नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वरिष्ठांच्या सुचना प्रमाणे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोंलीग करीत असतांना पोउनि युवराज चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली की, नगर दौंड रोडवर आरणगांव शिवारात आय पॅलेस येथे एक इसम अवैध विदेशी व देशी दारुची विक्री करीत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी बातमी मिळाल्याने सदर पथक हे नगर दौंड रोडवरील आय पॅलेस येथे जावून चौकशी केली असता तेथे एक इसम विदेशी दारुची विक्री करताना दिसला सदर पथकाची व पंचाची खात्री पटताच सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर मच्छिद्र कोठुळे रा. भूषणनगर केडगाव, अहमदनगर असे असलेचे सांगितले सदर इसम बसलेल्या ठिकाणची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये एकुण 28,150/- रुपये किमतीचा विदेशी व देशी दारुचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येवून सदर इसमाविरुध्द पोना/आनंद घोडके यांनी गुरनं 587/23 मुपोऍ़ 65(ई) प्रामणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले साो., सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/आनंद घोडके, पोकॉ/कमलेश पाथरुट, सोमनाथ वडणे, विक्रांत भालसिंग यांचे पथकाने केलेली आहे.