कौतुकास्पद

शेतक-यास लुटणारे आरोपी जामखेड पोलीसांकडुन 24 तासात जेरबंद! गुन्हा केल्याची दिली कबुली

जामखेड दि. 19 जुलै (प्रतिनिधी, रोहित राजगुरू)
दिनांक 15.07.2024 रोजी सायंकाळी-6 वा. चे सुमारास फिर्यादी -विकास दत्तू मलंगनेर वय 45 वर्ष धंदा शेती रा. नान्नज ता. जामखेड जि. अहमदनगर हे त्यांच्या कांदा विक्रीतून आलेली रक्कम रुपये 1लाख 60 हजार रुपये सोबत घेऊन जामखेड कडून नान्नज कडे जात असताना चुंबळी फाट्याजवळ अनोळखी चार आरोपी हे दोन मोटरसायकल वरून आले. व त्यांनी फिर्यादी यांची मोटार सायकल अडवून फिर्यादी व त्यांचे सोबत असलेले साक्षीदार -अशोक मोहोळकर यांना हाताने मारहाण करून फिर्यादी यांची रोख रक्कम 1लाख 60 हजार रुपये व फिर्यादीचा मोबाईल (7774955257) जबरीने चोरी करून जामखेडच्या दिशेने पळुन गेले आहेत अशी फिर्याद दिनांक 15/7/2024 रोजी सायंकाळी 23/35 वा जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 356-2024 बीएनएस कलम 309 (6), 3(5) याप्रमाणे दाखल केली आहे.
घटनास्थळी तात्काळ मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विवेकानंद वाखारे सो.कर्जत विभाग, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि. गौतम तायडे यांनी तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी भेट दिली होती. सदरील घटना घडल्याचे अनुषंगाने वरीष्ठांनी तपासाच्या सुचना देवुन तपास पथके तयार केली होती.

सदर गुन्ह्याचा तपास सपोनि.गौतम तायडे हे करीत असुन त्यांना जामखेड पेालीस स्टेशनचे पेालीस अंमलदार पोहेकॉ.प्रवीण इंगळे, पेाहेकॉ. अजय साठे, पोना.जितेंद्र सरोदे, पोना.संतोष कोपनर, पोकॉ.देविदास पळसे हे करीत होते. गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीसांना गुप्त बातमीद्वारा माहिती मिळाली होती की, दिनांक 15.07.2024 रोजी सायंकाळी-6 वा. च्या सुमारास चुंबळी फाट्याजवळ 1)पारस ऊर्फ डुच्या काळे, 2)दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड ता.जामखेड यांनी व त्यांचे इतर साथीदार यांनीच सदरचा गुन्हा केल्याची खात्रीदायक बातमी मिळाल्याने 1)पारस ऊर्फ डुच्या काळे, 2)दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड ता.जामखेड यांचे तपासकामी तात्काळ त्यांना पकडण्यासाठी वरील पथकास सुचना देवुन रवाना केले.
दिनांक 16/07/2024 रोजी दुपारी 4.30 वा.च्या सुमारास जामखेड पेालीस स्टेशनचे अंमलदार पोहेकॉ.प्रवीण इंगळे, पेाहेकॉ. अजय साठे, पोना.जितेंद्र सरोदे, पोना.संतोष कोपनर, पोकॉ.देविदास पळसे यांनी तात्काळ कुसडगाव रोड, वेताळ मंदीर, काझेवाडी तलावाजवळ सापळा लावुन तलावाच्या आडोशाला 2 आरोपी लपुन बसलेले दिसले. ते आम्हा पोलीसांना पाहुन तेथुन पळु लागले असता त्यांचा आम्ही पाठलाग करून त्यांना पकडले.
त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन अजुन या गुन्हयात कोण कोण आरोपी आहेत याबाबत विचारले असता त्यांनी 3)गणेश विटकर, 4)हरी माने(पुर्ण नाव माहिती नाही) रा.मुंजोबा गल्ली, जामखेड ता.जामखेड असा आम्ही सर्वानी मिळुन गुन्हा केला आहे. पाहिजे 2 आरोपी सध्या कोठे आहेत याबाबत विचारपुस करून पाहिजे 2 आरोंपीचा आम्ही जामखेड हद्दीत शोध घेत आहोत.
1)पारस ऊर्फ डुच्या काळे, 2)दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड ता.जामखेड यांना काल दिनांक 17/7/2024 रोजी जामखेड न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
सदर गुन्हयातील पाहिजे 2 आरोपी पोलीसांना चुकवून फरार होते. जामखेड पेालीस स्टेशनच्या पथकाने त्यांचे मागावर राहुन दिनांक 18/7/2024 रोजी जामखेड ते खर्डा जाणारे रोडवर 3)गणेश विटकर, 4)हरी माने रा.मुंजोबा गल्ली, जामखेड ता.जामखेड यांना दुपारी 12.10 वा.च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
1)पारस ऊर्फ डुच्या काळे, 2)दिपक ऊर्फ दिद्या बलभिम पवार दोन्ही रा. आरोळे वस्ती, जामखेड 3)गणेश विटकर, 4)हरी माने रा.मुंजोबा गल्ली, जामखेड ता.जामखेड यांना अटक करून गुन्हयातील गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला सो. पोलीस अधिक्षक सो.अहमदनगर, श्री.प्रशांत खैरे सो.अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्री. विवेकानंद वाखारे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत, यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.महेश पाटील, सपोनि. गौतम तायडे, पोहेकॉ.प्रवीण इंगळे, पोहेकॉ. अजय साठे, पोना.जितेंद्र सरोदे, पोना.संतोष कोपनर, पोना.अविनाश ढेरे, पोकॉ.देविदास पळसे, पोकॉ.प्रकाश मांडगे, पोकॉ.कुलदिप घोळवे, यांनी केली आहे .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे