प्रशासकिय
आतिवृष्टीमुळे पिक नुकसानीचे पंचनामे होऊन देखील हाळगाव येथील शेतकरी वंचित

हाळगाव :दि.१ ऑगस्ट (वार्ताहर: आप्पासाहेब खोटे)
जामखेड पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळगाव येथे आतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उडीद व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून देखील बऱ्याच शेतकऱ्यांची नावे प्रसारित याद्यांमध्ये नावे नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.मोजक्याच शेतकऱ्यांची नावे आल्यामुळे पीक नुकसानी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांमधे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या बाबतीत प्रशासनाने लवकर दखल घ्यावी अशा आशाळभूत नजरेने हवालदिल झालेला शेतकरी प्रशासनाकडे पाहत आहे.