कर्जत भाजपा शहर कार्यकारिणी जाहीर : गणेश क्षीरसागर

कर्जत (प्रतिनिधी) : दि १९ जून
भाजपाचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहर आणि विविध आघाडीच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, नीता कचरे, आरती थोरात, राणी गदादे आदी हजर होते.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर म्हणाले की, शहरात सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे पोहचून जनतेच्या मनात पक्षाचा विश्वास अधिक वाढविण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी काम करावे. कर्जत शहरात लवकरच पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले.
भारतीय जनता पार्टी कार्यकारणी (शहर)पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष- रविंद्र नेवसे, सागर साळुंके, उमेश जपे, राजेंद्र येवले
सरचिटणीस- सुभाष खरात. चिटणीस- शेखर डाडर, संतोष पठाडे. कोषाध्यक्ष- दादासाहेब शिंदे
युवा मोर्चा कार्यकारणी-(शहराध्यक्ष) रविकिरण कानडे. उपाध्यक्ष- धनंजय आगम, गणेश काटे, विठ्ठल नांगरे, मोहिनेश सरोदे. सरचिटणीस – आदित्य भोज. चिटणीस- संजय जाधव, भाऊ भांड. अल्प संख्याक कार्यकारणी(शहराध्यक्ष) मुबिन बागवान. युवा वोरियर्स(शहराध्यक्ष) यशराज बोरा अशा निवडी जाहीर करून त्यांचा निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजीमंत्री प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडून नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.