अनाथ आश्रमातील चिमुकल्यामध्ये गुरूवर्य श्री सदगुरु मनोहर मामा यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रम घेत साजरा

भोसे दि.२१ जुलै (प्रतिनिधी)
श्री सदगुरु मनोहर मामा यांचा अभिष्टचिंतन सोहळा श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे-चखालेवाडी वतीने कर्जत येथील स्नेहप्रेम संस्था,राशीन येथील संकल्प विद्यार्थी वसतिगृह येथील गरजु विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला तसेच शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी स्वप्नील गोजगे, यश राचकर, संदीप टिळेकर, योगेश पवार, दत्तात्रय टिळेकर, महेश यलगोंडी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्व समजावून सांगत भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेछया दिल्या.
संकल्पच्या संचालिका प्रणिता भोसले यांनी संस्थेची माहिती देताना संस्था वंचित घटकातील ,गरीब कुटूंबातील तसेच अनाथ मुलांचे संगोपन व त्यांना योग्य शिक्षण देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. स्न्हेहप्रेमचे फारूक बेग यांनी मनोगत व्यक्त करत गुरुवर्य श्री सदगुरु मनोहर मामांच्या अध्यात्मिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने दिगंबर ढोले यांनी गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व गणवेश वाटप यासारखे सामाजिक उपक्रम हे गुरूवर्य सदगुरु श्री मनोहर मामांच्या अध्यात्मिक कार्याच्या प्रेरणेतून सर्व गुरुबंधूच्या माध्यमातुन होत असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारूक बेग यांनी केले तर संचालिका स्वाती ढवळे यांनी आभार मानले.