गुरूवर्य श्री सदगुरु मनोहर मामा भोसले यांचा अभिष्टचिंतन सोहळा प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यासमवेत साजरा

भोसे दि. २१ जुलै (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील वाघनळी व चखालेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवर्य श्री सदगुरु मनोहर मामा भोसले यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संतोष वायकर, शिक्षक संपत बिटके, भोसे गावचे युवा नेते मयुर खराडे, प्रगतशील शेतकरी सतिश साळुंके यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप केले. प्रतिष्ठानच्या वतीने दिगंबर ढोले यांनी गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व गणवेश वाटप यासारखे सामाजिक उपक्रम हे गुरूवर्य सदगुरु श्री मनोहर मामांच्या अध्यात्मिक कार्याच्या प्रेरणेतून व सर्व गुरुबंधूच्या माध्यमातुन होत असल्याचे सांगितले.यावेळी चखालेवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याविषयी विध्यार्थ्यांना माहिती देत आभार मानले.