गुन्हेगारी

नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकाच दिवशी 8 हातभट्टीवर कारवाई एकुण 4,76,500/- रु.की.मुद्देमाल नाश, नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई

अहमदनगर दि.२१ जुलै (प्रतिनिधी)
नमुद बातमीतील हकीकत अशी की, मा. पोलीस अधीक्षक मा. श्री राकेश ओला साो. यांनी सपोनि शिशिरकुमार देशमुख, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध हातभट्टी दारुसंबधी कारवाई करणेबाबत सुचना केल्या.
त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका यांनी अवैध हातभट्टी दारुवर करवाई करणेकामी स्वत: सोबत येऊन पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, मसफौ/अमिना शेख, पोहेकॉ/लगड, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, मपोना/गायत्री धनवडे, पोकॉ/कमलेश पाथरुट, निलेश खिळे, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे, राजू खेडकर असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन अवैध हातभट्टीवर कारवाई करणेकामी सुचना व मार्गदर्शन केले.
सदर पथकांने प्रथम खंडाळा गावच्या शिवारात जावून दोन हातभट्टयावर कारवई केली त्यामध्ये हातभट्टी साठी वापरण्यात येणारे एकुण 33,000 लिटर कच्चे रसायण नष्ट करण्यात आले व त्यानंतर खडकी गावच्या शिवारात जावून तेथे एकुण दोन गावठी हातभट्टीवर कारवाई करुन एकुण 70 लिटर तयार दारुवर करावई करुन ती नष्ट करण्यात आली. त्यानंतर सदर पाथक धोंडेवाडी, वाळकी गावच्या शिवारात जावून तेथे एका हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये एकुण 800 लिटर कच्चे रसायण नष्ट करण्यात आले. त्यानंतर साकत येथे जावून तेथे एका हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये एकुण 400 लिटर कच्चे रसायण जागीच पंचासमक्ष नष्ट करण्यात आले त्यानंतर सदर पथक नेप्ती गावच्या शिवारात जावून तेथील दोन हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये एकुण 1300 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणार कच्चे रसायण व 55 लिटर तयार दारु नष्ट करण्यत आले. *सदर पथकाने एकाच दिवशी एकुण 08 हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये 25,200 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायण व 125 लिटर तयार दारु असा एकुण 4,75,500/- रुपयेचा मुद्देमाल जागीच पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.*
सदर कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नावे खालील प्रमाणे
1) गुरनं. 571/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) आरोपीचे नाव युवराज पोपट गिऱ्हे रा. खंडाळा
2) गुरनं. 573/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) आरोपीचे नाव गणेश पोपट गिऱ्हे रा. खंडाळा
3) गुरनं. 574/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) आरोपीचे नाव अशोक विश्वनाथ पवार रा.खडकी
4) गुरनं. 575/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) आरोपीचे नाव सुमन संजय पवार रा.खडकी
5) गुरनं. 576/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) आरोपीचे नाव उध्दव अनिल पवार रा.वाळकी
6) गुरनं. 577/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) आरोपीचे नाव दत्तू महिपती पवार रा.साकत
7) गुरनं. 579/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) आरोपीचे नाव मंगल भारत पवार रा.नेप्ती
8) गुरनं. 580/23 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) आरोपीचे नाव सुलभा दिलीप पवार रा.नेप्ती
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले साो., सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, मसफौ/अमिना शेख, पोहेकॉ/लगड, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, मपोना/गायत्री धनवडे, पोकॉ/कमलेश पाथरुट, निलेश खिळे, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे, राजू खेडकर यांचे पथकाने केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे