कौतुकास्पद
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या सायबर विभागातील तीन पोलीस कर्मचारी एलएलबी पदवी परीक्षेत यशस्वी!

अहमदनगर दि. २१ जुलै (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस स्टेशन येथील कार्यरत असणारे पोलीस नाईक अभिजित अरकल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रितम गायकवाड यांनी न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर या विधी महाविद्यालयातून विधी विभागाची (LLB) या ३ वर्षाची पदवी परीक्षेत यशस्वी होऊन पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथील प्राध्यापक ad. तांबे सर, शिंदे सर, पांढरे सर, सुनील जाधव सर,केदार सर, वराट सर, राकेश बोगा सर, अतुल म्हस्के सर,हिंगडे सर, भवाल सर, पूनम वडेपल्ली मॅडम, सांगळे मॅडम, खुळे मॅडम, मते मॅडम, जाधव मॅडम,मोरे सर,ह्याचे मार्गदर्शन लाभले आहे.