जबरी चोरीच्या उद्देशाने खुन करणारे आरोपीसह एकास २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक!

अहमदनगर दि. ११ जुलै (प्रतिनिधी) राहता येथील राहाता येथील जबरी चोरीच्या उद्देशाने खुन करणारे सराईत आरोपीसह एकास
२४ तासाचे आत अटक केले आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ०८/०७/२३ रोजी फिर्यादी श्री. नवनाथ दादासाहेब
चौधरी, वय ४१, रा. भैरवनाथ नगर, गोंधवणी, ता. श्रीरामपूर यांचे मयत भाचा सुधीर अशोक कांदे वय ३५,
रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर यास अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने भोसकुन, जखमी
करुन जिवे ठार मारले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन राहाता पोलीस स्टेशन
गु.र.नं. ३५६ / २०२३ भादविक ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि / श्री. दिनेश आहेर, यांना ना उघड
खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन, ना उघड गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,
पोहेकाँ/दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,
संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोकॉ/मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार
यांचे पथके नेम
ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद
सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन संशयीत
इसम नामे मयुर काळे व किरण काकफळे दोन्ही रा. श्रीरामपूर यांचा शोध घेवुन ते मिळुन आल्याने त्यांना
शिताफीने ताब्यात घेतले. ताव्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव
विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मथुर विजय काळे वय २१, रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता.
श्रीरामपूर व २) किरण सुरेश काकफळे वय २४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता. श्रीरामपूर असे सांगितले.
त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना
अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी मयत इसम रस्त्याने पायी जाताना त्यास
लिफ्ट देण्याचा बहाण्याने मोटार सायकलवर बसवुन निर्जनस्थळी नेवुन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन
जखमी करुन जिवे ठार मारुन त्याचा मोबाईल फोन घेवुन गेलो अशी हकिगत सांगितल्याने दोन्ही आरोपींनी
गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना राहाता पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहाता
पोलीस स्टेशन करीता आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ०८/०७/२३ रोजी फिर्यादी श्री. नवनाथ दादासाहेब
चौधरी, वय ४१, रा. भैरवनाथ नगर, गोंधवणी, ता. श्रीरामपूर यांचे मयत भाचा सुधीर अशोक कांदे वय ३५,
रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर यास अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने भोसकुन, जखमी करुन जिवे ठार मारले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन राहाता पोलीस स्टेशन
गु.र.नं. ३५६ / २०२३ भादविक ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला साहेब, स्थानिक गुन्हे शाखेचे यांनी पोनि / श्री. दिनेश आहेर, यांना ना उघड
खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन, ना उघड गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,
पोहेकाँ/दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,
संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोकॉ/मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार
यांचे पथके नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद
सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन संशयीत
इसम नामे मयुर काळे व किरण काकफळे दोन्ही रा. श्रीरामपूर यांचा शोध घेवुन ते मिळुन आल्याने त्यांना
शिताफीने ताब्यात घेतले. ताव्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव
विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मथुर विजय काळे वय २१, रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता.
श्रीरामपूर व २) किरण सुरेश काकफळे वय २४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता. श्रीरामपूर असे सांगितले.
त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना
अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी मयत इसम रस्त्याने पायी जाताना त्यास
लिफ्ट देण्याचा बहाण्याने मोटार सायकलवर बसवुन निर्जनस्थळी नेवुन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन
जखमी करुन जिवे ठार मारुन त्याचा मोबाईल फोन घेवुन गेलो अशी हकिगत सांगितल्याने दोन्ही आरोपींनी
गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना राहाता पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.