निस्वार्थ काम केल्यामुळेच संतोष बोरा यांची बिनविरोध निवड – श्रीनिवास बोज्जा अहमदनगर इंडस्ट्रिअल इस्टेट च्या संचालक पदी संतोष बोरा यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल फटाका असोसिएशनच्या वतीने सत्कार

अहमदनगर दि. ११ जुलै (प्रतिनिधी) अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने फटाका असो. चे सचिव संतोष बोरा यांची अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल असो. चे जेष्ठ सदस्य देविदास ढवळे, शिरीष चंगेडे व सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या वेळी बोलतांना असो.चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने प्रत्येक सभासदांचे हित पाहून कार्य करीत असते. संतोष बोरा यांची बिनविरोध निवड ही असोसिएशन साठी अभिमानाची गोष्ट आहे. निस्वार्थ पणे काम केल्यामुळेच त्यांची निवड झालेली आहे.चांगले काम केल्यास त्याकामाचे फळ हे नेहमीच चांगले मिळते म्हणून कोणतेही काम करीत असतांना फळाची अपेक्षा ठेवू नका चांगले काम करत रहा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना संतोष बोरा म्हणाले माझा हा सत्कार नक्कीच मला या पुढे काम जोमाने करण्यासाठी ऊर्जा ठरेल. हा सत्कार असो चे वतीने झाला परंतु मी हा सत्कार माझ्या परिवारातील लोकांनी केला असे मानतो. त्यांनी सर्व सभासदांचे व असो. चे मनापासून आभार मानले.
सदरहू कार्यक्रम चे सूत्रसंचालन सोमनाथ रोकडे यांनी केले तर स्वागत सुरेश जाधव यांनी केले तर आभार शिरीष निखिल परभणे यांनी मानले या वेळी सुनील गांधी, अशोक कर्डीले, गणेश परभने, साहेबराव गारकर, संजय सुराणा, संतोष वल्ली, शिवराम भगत, राजू छल्लानी, उमेश क्षीरसागर, संतोष तोडकर, अनिल टकले, अमोल तोडकर, संजय जंजाळे, आदी उपस्थित होते.