प्रशासकिय

मनपा अधिकारी यांचा मनमानी कारभार संतोष धुमाळ यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढे सरसावली

अहमदनगर दि. ११ जुलै (प्रतिनिधी):- अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर शहर हद्दीतील शिलाविहार-श्रीराम चौक रोड वरील ६० फुटी रस्त्यालगत १५ फूट रोड साईड मार्जिन आणि सोसायटीचा रस्ता सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून गायब करून बेकायदेशीर बांधकाम करणारे तुकाराम गव्हाणे या व्यक्तीला दिलेली प्रथम आणि द्वितीय सुधारित बांधकाम परवानगी रद्द करणेबाबत व रस्त्यात केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी संतोष धुमाळ हे १० जुलै २०२३ पासून आमरण उपोषणास बसले असून यासंदर्भात संतोष धुमाळ यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव स्थानिक रहिवासी सामाजिक कार्यकर्ते योगेश साठे यांचेकडे तक्रार करून न्याय मिळवून द्यावा अशी लेखी पत्राद्वारे केली होती त्यास अनुसरून अहमदनगर महानगपालिका आयुक्त आणि संबंधित नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार चारठाणकर यांचेकडे योगेश साठे हे वेळोवेळी पाठपुरावा करीत असताना संतोष धुमाळ यांचा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी हे तुकाराम गव्हाणे यांचेशी आर्थिक हितसंबंध जपत नियमबाह्य बेकायदेशीर पने परवानगी देत असल्याचे निदर्शनास आले आहे यासर्व बाबी लक्षात घेता साठे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांचेकडे देखील निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.धुमाळ हे आमरण उपोषणाला बसले असताना याबाबत अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांना योगेश साठे हे जाब विचारण्यासाठी गेले असता सदर सर्व विषयी आयुक्तां सोबत चर्चा केली असता आयुक्त साहेब यांनी मी धुमाळ यांना अजून १५ दिवस बसवून ठेवणार आहे आणि नगररचनाकार चारठाणकर हे रजेवर असल्याने मी काही करू शकत नाही त्यांनी विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने हे आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या ह्या रास्त नाहीत असा उलटा सवालच त्यांनी उपस्थित बांधवांसमोर केला.यावर साठे यांनी सांगितले की आयुक्त साहेब आपण एक जबाबदार लोकसेवक आहात असे बोलणे आपणास अशोभनीय आहे याप्रकरणात तुकाराम गव्हाणे यांचे आणि विद्यमान नगरसेवक यांचे घनिष्ट नातेसंबंध असल्याने मनपा प्रशासन गव्हाणे यांना पाठीशी घालत आहेत का? आपण संबंधित विभागाचे अधिकारी जर गैरहजर असतील तर त्यांची जबाबदारी ही दुसऱ्या एका सक्षम अधिकारी यांचेकडे द्यावी कारण उपोषणकर्ते यांना बीपी शुगर चा त्रास असल्याने धुमाळ यांना काही कमीजास्त झाल्यास तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे आपण लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली त्याच बरोबर नगररचनाकार चारठाणकर यांनी आतापर्यंत ज्या काही नियमबाह्य बांधकाम परवानग्या दिल्या आहेत त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश चारठाणकर यांचेसह यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर उपोषणकर्ते यांची मागणी पूर्ण न झाल्यास नगररचनाकार चारठाणकर यांचेसह अहमदनगर महानगरपालिका यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविण्यात येईल अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने घेण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ऊस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पाडले,शेलार,राहुल पाडले आदीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे