आरोग्य व शिक्षण

जामखेड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दिशेने वाटचाल…

जामखेड दि.२९ जून (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होते . पंचायत समितीच्याच्या विस्तार अधिकारी यांचे कडे पदभार होता. नव्याने बदलून आलेले व जामखेड तालुक्यातील रहिवाशी असलेले श्री बाळासाहेब धनवे यांनी तालुक्यात शिक्षक , विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे . अचानक शाळा भेटी करून काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत .
जामखेड तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्व शाळा चांगल्या आहे उदा. प्राथमिक शाळा सारोळा या शाळेचा विद्याथों पट पाच वर्षा पूर्वी ३७ होता आज पट १८३च्या पुढे आहे . येथील शिक्षकांनी स्थानिक ग्रामस्याच्या मदतीने लोक सहभागातून शाळेला बगीचा , क्रिंडागण , इमारत बांधकाम केले आहे. या शाळेची शै. गुणवत्ता चांगली आहे. एखाद्या शहरातील खाजगी शाळेलाही लाजवेल अशी सारोळा गावची जिल्हा परिषदेचे शाळा आपणांस पहावयास मिळते . अरणगांव जिल्हा परिषद शाळेचे सर्व खोल्या डिजिटल असून विद्यार्थ्यांना अधूनिक पधतीने अध्यापन केले जाते . त्यामुळे शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने खडकत ता. आष्टी जि. बीड या पर जिल्ह्यातील गावातून अरणगांव शाळेला दररोज २८ विद्यार्थी दररोज वाहनाने ये जा करतात ही तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे .
आत्ताच नवोदय विद्यालयाच्या परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद शाळा पिंपररखेड येथील एक विद्यार्थी सुरेश सानप लटकेवस्ती येथील दोन विध्यार्थी नवनाथ बहीर , लक्ष्मी लटके या मुलांनी गुणवत्ता यादीत बाजी मारली असून टाकळी डोकेश्वर येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आहे .
तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढले आहे . जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी लोक सहभागातून तर काही ठिकाणी स्वतः पैसे खर्च करून शाळेला रंगरंगोटी केली आहे . उन्हाळ्याच्या सुट्टीत सुध्दा शिक्षकांनी शाळेच्या आवारात असलेल्या बगीचा व झाडांना पाणी दिले आहे .
शाळेच्या पहित्याच दिवशी सर्व मुलांना पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. पहिल्या नवगत विद्यार्थी यांचे घोड्यावरून , बैलगाडीतून उत्साहात स्वागत करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला आहे . खर्डा मुले /मुली शाळा , शुक्रवार पेठ, जामखेड मुले /मुली शाळा , घोडेगांव . फक्राबाद अदि .ठिकाणी विद्यार्थी दिंडीचे आयोजन केले होते. यात शिक्षक विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत . एकंदर परिस्थिती पाहता जामखेड तालुका शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे पहावयास मिळत आहे ही आनंदाची बाब आहे .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे