धार्मिक
मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करत केली ईद साजरी

अहमदनगर दि.२९ जुन (प्रतिनिधी):- मुस्लिम समाजामध्ये बकरी ईद हा सण मोठया प्रमाणावर संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. अहमदनगर शहरामध्ये आज मुस्लिम धर्मियांची ईद शांततेत पार पडली किंग्स गेट रोड परिसरातील ईदगाह मैदान याठिकाणी सकाळी साडे नऊ वाजता ईदच्या नमाज पठनाचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय उस्फुर्त व आनंदमयी वातावरणात मुस्लिम समाज बांधव ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने नमाज पठणासाठी एकत्र जमले होते.नमाज पठणा नंतर बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त ईदगाह मैदान येथे तैनात करण्यात आला होता.