महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय सहज कृषी कार्यशाळा संपन्न

अहमद दि.२९ जून (प्रतिनिधी) – प. पू. माताजी श्री निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट, नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय सहज कृषी अभियानांतर्गत रिजनल सहज कृषी सेमिनार ची सुरुवात प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेस पुष्प अर्पण करून व प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सहज कृषी समन्वयक महेश आव्हाड, अहमदनगर जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, श्री.नारायण निबे, श्री. बाळासाहेब शेवाळे, श्री. देविदास बागुल, श्री. मंगेश सातोस्कर , हनुमंथ रायुडू, दिलीप सिंह, विरेश हल्लूर, श्री. शांतीलाल पटेल, श्री. सोमनाथ कुंबळे व दत्तू लगड यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
दोन दिवस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . या सेमिनारद्वारे श्री माताजीनी सांगितल्या प्रमाणे सहज कृषीचे तंत्रज्ञान, महत्त्व व फायदे याबद्दल माहिती दिली. तसेच आलेल्या इतर तज्ञ लोकांनी शेती व पशुपालन या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विद्यापीठातील हवामान अद्यावत शेती व जल व्यवस्थापन चे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र यांच्याकडून वरिष्ठ संशोधन सहाय्यक शुभांगी घाडगे मॅडम यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागात सहजयोग व सहजकृषि प्रचार प्रसार साठी करायाच्या योजना संबंधी पंजाबराव बिहाडे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्री. शांतीलाल पटेल व सोमनाथ कुंबळे यांनी सहज कृषि विषयी मार्गदर्शन केले.
सेमिनार मध्ये शेतकरी व त्यांचे शेतीसंबंधी असलेले प्रश्न व त्यावरील उपाय योजना यावर चर्चासत्र झाले.
आजच्या आधुनिक शेतीला सहज कृषीची (आध्यात्मिक शेतीची) जर जोड दिली तर शेतकऱ्यांचे जीवन कसे सुखकारक होऊ शकते यासंबंधीची माहिती श्री नारायण निबे, प्रादेशिक सहज कृषी समन्वयक यांनी श्रोत्यांना करून दिली. तसेच आलेल्या सर्व सहजयोग्यांना कृषी विद्यापीठातील महत्त्वाची ठिकाणे व सहज कृषीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
या कार्यक्रमात अहमदनगर सहजयोग युवाशक्ती यांच्याकडून भरतनाट्यम नृत्य व भजन संध्या सादर करण्यात आली.
या सेमिनारचा भारतातील इतर राज्यातून व महाराष्ट्रातून आलेल्या १६० सहजयोग्यांनी लाभ घेतला.
हा सेमिनार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सहजकृषी समन्वयक श्री महेश आव्हाड व अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्री श्रीनिवास बोज्जा यांचे मार्गदर्शन लाभले. या सहजकृषि कार्यशाळेस सहजयोगी विनाताई बोज्जा, नामदेव रहाणे, बाळासाहेब ताकटे, बबन धोंडे, कर्णा तुवर, चंद्बारशेखर सोनावणे, बाळासाहेब शेवाळे, श्री. देविदास बागुल, कळसे सर, मंगेश सातोस्कर , चेतन कानडे अनंत रोहकले , विठ्ठल राठोड, प्रशांत राजवाळ, हनुमंथ रायुडू, दिलीप सिंह, विरेश हल्लूर, राजू दावनपल्ली , मोहन रच्चा आदी उपस्थित होते.