भिंगार नाला येथे 6,35,600/- रु.किंमतीची सुगंधी तंबाखु बाळगणाऱ्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि. २६ जून (प्रतिनिधी) भिंगार नाला येथे 6,35,600/- रु.किंमतीची
सुगंधी तंबाखु बाळगणाऱ्या आरोपी विरुध्द कारवाई करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/सचिन आडबल, संतोष खैरे, पोकॉ/रोहित मिसाळ, रणजीत जाधव यांना कार्यालयात बोलावुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे जितेंद्र चांडक ऊर्फ मालपाणी हा त्याचा हस्तक नामे उमेश शामलाल मालपाणी दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर याचे मार्फत सुझूकी कंपनीचा कॅरी टेम्पो मधुन सुगंधी तंबाखु विक्री करण्याचे उद्देशाने भिंगार नाला परिसरात येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, पोनि/दिनेश आहेर यांनी वर नमुद पथकास पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भिंगार नाला परिसरात जावुन सापळा लावुन थांबलेले असताना एक टेम्पो येवुन थांबला. टेम्पोमध्ये काही इसम बसलेल दिसले. थोडा वेळात एक इसम मोपेड गाडीवर येवुन टेम्पो मागे थांबला. चालकाने टेम्पो मधुन एक पांढरे रंगाची गोणी मोपेड चालकास दिली. पथकाची खात्री होताच पथकाने टेम्पो मधील व मोपेडवरील इसमांना जागीच ताब्यात घेतले. ताब्यातील इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी यांची नावे 1) उमेश शामलाल मालपाणी वय 31, रा. वावरेचाळ, मनमाड, ता. नांदगांव, जिल्हा नाशिक, 2) सुभाष अशोक बोर्डे, वय 27, रा. भाऊसिंगपुरा, साईनगर, लालमाती, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 3) शुभम रंगनाथ टाले, वय 23, रा. इसोली, ता. चिखली, जिल्हा बुलढाणा व 4) मयुर रतन चाबुकस्वार, वय 30, रा. ब्राम्हणगल्ली, माळीवाडा, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. सदर मालवाहु टेम्पोची पहाणी करता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी मिळुन आली. ताब्यातील इसमांना सदर सुगंधी तंबाखु कोणाची आहे अशी विचारणा करता त्यांनी 5) जितेंद्र नरेंद्र चांडक ऊर्फ मालपाणी रा. लवेंडर सोसायटी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) यांचे मालकीची असल्याचे सांगितले.
ü ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 85,600/- रुपये किंमतीची विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, 50,000/- रुपये किंमतीची सुझूकी ऍ़क्सेस मोपेड गाडी व 5,00,000/- रुपये किंमतीची सुझूकी कंपनीचा मालवाहु टेम्पो असा एकुण 6,35,600/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 389/23 भादविक 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.