राजकिय

आयुक्त सुस्त, सिग्नल बंद.. डीएसपी चौकातील सिग्नल सुरू करा – किरण काळे ; अन्यथा संवेदनशील व अकार्यक्षम असणाऱ्या आयुक्तांचीच गाडी अडवू, काँग्रेसचा इशारा

अहमदनगर दि.२६ जून (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे. अन्यथा या चौकातून आयुक्तांची गाडी जाताना दिसल्यास ती अडवू, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

यावेळी आयुक्तांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल गुलाब पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. मनपा आयुक्त पंकज जावळेंची काँग्रेस शिष्टमंडळाने काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, आकाश आल्हाट, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, गौरव घोरपडे, सुनील लांडगे, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, धनंजय देशमुख, प्रणव मकासरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळे म्हणाले की, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या वाहतूक नियंत्रण केले जाते. मात्र वाहतुकीचे योग्य प्रकारे संचलन होण्यास अडथळा निर्माण होऊन अनेकदा ट्राफिक जाम होते. मनपा कार्यालया जवळ असणारा सिग्नलच बंद असून देखील मनपा झोपलेली आहे. तीन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयां जवळ असणारा सिग्नल बंद आहे. आयुक्त सुस्त असल्यामुळे सिग्नल बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीकडे आयुक्तांचे लक्ष नाही. नागरी प्रश्नांबद्दलच्या ते असंवेदनशील व अकार्यक्षम आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, मनपाने जरी या प्रश्नात
स्वतःहून लक्ष घातले नसले तरी शहर काँग्रेस ही नागरिकांच्या वतीने जागरुक असून आता काँग्रेसने लेखी निवेदनाद्वारे मनपाचे या समस्येकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांची गैरसोय तात्काळ दूर करण्यासाठी सदर सिग्नल तात्काळ सुरू करण्याबाबत मनपाने कार्यवाही करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देखील समक्ष देत त्यांच्याकडे देखील याबाबत मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे