देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर:दि. 29 डिसेंबर -अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी नगरसेविका सौ. विना श्रीनिवास बोज्जा यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून ब व क गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांचे पती श्री. श्रीनिवास बोज्जा यांनी प्रभाग क्रमांक ६ मधील ड गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या प्रसंगी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार माजी नगरसेविका वीणा बोज्जा व श्रीनिवास बोज्जा यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रभागातील जेष्ठ नागरिक अशोक काळे काका, चंद्रकांत कोडम, दत्तात्रय रामगिरी, रामचंद्र जिंदम, चंद्रकांत बोज्जा, गणेश बिटला, राजू द्यावनपेल्ली, संजय बोज्जा, मोहन रच्चा, अशोक बिटला, सौ. कन्ना, सौ. अण्णलदास, श्रीमती बुरा काकू, भापकर काकू, सौ. सुनीता शिंदे, मनोज बोज्जा, विद्या रमीगिरी, राणी बोज्जा,सरिता रामगिरी, रेखा जव्हेरी,सोनाली बोज्जा आदी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा