माझी वसुंधरा अंतर्गत मिळणारऱ्या परितोषक रकमेतून संपूर्ण शहरामधे वृक्ष लागवड़ ,वृक्ष संवर्धन करावे: तुलसीराम पालीवाल

अहमदनगर दि.९ जून (प्रतिनिधी) – माझी वसुंधरा अंतर्गत मिळणारऱ्या परितोषक रकमेतून संपूर्ण शहरामधे वृक्ष लागवड़ ,वृक्ष संवर्धनकरून अ नगर च्या वसुंधरे ची सेवा मोहिम राबवावे अशी मागणी
तुलसीराम पालीवाल यांनी वृक्ष प्राधिकरण सदस्य व पर्यावरण दूत, अहमदनगर महानगर पालिका अहमदनगर यांनी मा. आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका व मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना एका निवेदना द्वारे केली आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगीरी व राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून देणारे महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रथमतः हार्दीक अभिनंदन करतो.
अ.नगर शहर हे वृक्ष लागवड़, वृक्ष आणी पर्यावरण बाबत उपेक्षित राहिले आहे आस पास च्या शहरापेक्षा अ नगर मधे झाड़ांची संख्या फार कमी आहे या मुळे पावसाचे प्रमाण ही कमी होते या साठी
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मिळणारऱ्या पारितोषक रकमेचा उपयोग अहमदनगर महानगरपालिका चे इतर विकास कामा करिता केल्यास पुन्हा अहमदनगर शहर निसर्गापासून वंचित राहील यासाठी या पारितोषिक रक्कमेतील जास्तित जास्त रक्कम
वृक्ष लागवड़ व वृक्ष संवर्धन करिता खर्च करावी व मा. आयुक्त साहेब यांनी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून या कामा मधे भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेऊन आलेल्या प्रत्येक रुपया मधून शहरा मधील वसुंधरेची सेवा करावी आणी पर्यावरण आणी प्रदूषणा चा समतोल राखण्याची उपाययोजना करण्यात यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुलसीराम पालीवाल यांनी केले आहे.