सामाजिक

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणार : किरण काळे ; शहर स्थापना दिनानिमित्त काँग्रेसने दिव्यांगांचा सत्कार करत शहरवासीयांना दिल्या शुभेच्छा

अहमदनगर दि. २९ मे (प्रतिनिधी) : दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते इतरांवर अवलंबून असतात. कुटुंबीयांना यामध्ये मोठी कसरत करावी लागते. मनपा कडून मिळणाऱ्या मानधनासह राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस शहरात काम करणार असल्याचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रतिपादन केले आहे.
शहर स्थापना दिनानिमित्त काँग्रेसकडून शिवनेरी पक्ष कार्यालयात दिव्यांगांचा सत्कार करत शहरवासीयांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काळे बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक तथा ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहर समन्वयक सोफियान रंगरेज, महिला अपंग विभाग समन्वयक मिनाज सय्यद, मेहराज शेख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश अल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
काळे म्हणाले की, ज्या दिव्यांग बांधवांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण कमी आहे, अशांना रोजगारक्षम बनविण्याची गरज आहे. स्वतःची दैनंदिन कामं ते स्वतः करू शकतील अशा पद्धतीने त्यांना घडविण्याची गरज आहे. कमी श्रमाचे मात्र कौशल्य पूर्ण कामांचे त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी काळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेत रखडलेले मनपा दिव्यांग सहाय्यता मानधन देण्याची मागणी केली होती. मनपाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून जानेवारी महिन्याचे मानधन दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. काळे यांच्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा आधार मिळाला असून इथून पुढील काळात दिव्यांगांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांची मोठी मदत होणार असल्याचे भावना यावेळी सोफियान रंगरेज यांनी व्यक्त केली.

दिव्यांगांसाठी काँग्रेसची हेल्पलाईन :
नगर शहर व तालुक्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. मानधन, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, महानगरपालिका, जिल्हा परिषदसह शासकीय कार्यालयांत रखडलेली कामे आदी समस्यांसाठी दिव्यांग बांधव काँग्रेसच्या हेल्पलाईनवर चोवीस तास ३६५ दिवस केव्हाही संपर्क साधू शकतात. यासाठी काँग्रेसच्या वतीने काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक ९०२८७२५३६८ हेल्पलाईन म्हणून यावेळी दिव्यांग बांधवांसाठी जाहीर करण्यात आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे