अहमदनगर शहर व उपनगरात अवैधरित्या विक्री होणारी ई सिगारेट व हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! पाच इसमांविरुद कारवाई करुन एकुण 42,610/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत!

अहमदनगर दि.१२ मे (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डीले, विशाल गवांदे, सचिन आडबल, पोकॉ/रणजीत जाधव व मपोकॉ/सारीका दरेकर यांचे पथक नेमून अहमदनगर शहरामध्ये अवैध हुक्का पार्लर विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक पेट्रोलिंग फिरुन माहिती घेत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक जाणारे रोडवर पान फंडा नावाचे दुकानात चेतन खर्डे सार्वजनीकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असा तंबाखुजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन ई सिगारेट हुक्यांची तंबाखु व फ्लेवर याची चोरुन विक्री करीत आहे. तसेच सर्जेपुरा येथील इंगळे आर्केडचे तळघरामध्ये कृष्णा इंगळे हा बंदी असलेला हुक्कापार्लर चालवित आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन प्रोफेसन चौकातील पान फंडा येथुन एका इसम शासनाने बंदी घातलेली ई सिगारेट, हुक्क्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने विक्री करताना मिळुन आल्याने त्यास 22,380/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेतले. तसेच पथकाने सर्जेपुरायेथील इंगळे आर्केड येथील तळघराजवळ जावुन खात्री करता काही इसम हुक्का पिताना व एक इसम हुक्कापिण्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने पुरविताना मिळुन आल्याने अचानक छापा टाकुन 20,230/- रुपये किंमतीचे मुद्देमाल असा एकुण 42,610/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
अ.नं. पो.स्टे. गुरनं व कलम आरोपी नांव जप्त मुद्येमाल
1. तोफखाना 704/23 भादविक 188, 272, 273 सह सिगारेट व तंबाखु उत्पादने अधिनियम कलम 4 व 21 (1) 1) चेतन बाबासाहेब खर्डे, वय 31, रा. प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर 22,380/- ग्रेप्स, अरेबियन, स्ट्रॉबेरी आईस, लश आईस, पॅशन फ्रुट, हुक्का फ्लेवर व इलेक्ट्रीक सिगारेट
2. तोफखाना 711/23 भादविक 285, 334, 188, 272, 273 सह सिगारेट व तंबाखु उत्पादने अधिनियम कलम 4 व 21 (1) 1) प्रशांत गजानन सोनवणे वय 32, रा. केडगांव, अहमदनगर
2) जुबेर फिरोज सय्यद वय 19, रा. बोल्हेगांव, ता. नगर
3) तेजस मिलिंद भिंगारदिवे वय 20, रा. आर्यन कॉलनी, बोल्हेगांव, ता. नगर
4) कृष्णा अशोक इंगळे रा. सर्जेपुरा, अहमदनगर (फरार) 20,230/- काचेचे व स्टीलचे पॉट, रबरी पाईप, विविध प्रकारचे फ्लेवर, प्लॅस्टीक फिल्टर, मातीची चिलम, लोखंडी चिमटा, फॉईल पेपर व कोळसा
एकुण 05 आरोपी 42,610/- रुपये किंमतीचा ग्रेप्स, अरेबियन, स्ट्रॉबेरी आईस, लश आईस, पॅशन फ्रुट, हुक्का फ्लेवर व इलेक्ट्रीक सिगारेट काचेचे व स्टीलचे पॉट, रबरी पाईप, विविध प्रकारचे फ्लेवर, प्लॅस्टीक फिल्टर, मातीची चिलम,
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री, प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.