सहजयोग ध्यान नित्य नियमाने केल्यास सुख शांती समाधान प्राप्त होते -सरपंच सुभाष शेळके सहजयोग ध्यान साधनेचा कार्यक्रम धानोरा गावात संपन्न!

अहमदनगर दि. ९मे (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवार यांच्या वतीने धानोरा, ता. आष्टी, जि. बीड या गावातील ग्रामस्थासाठी सहजयोग ध्यान साधना व कुंडलिनी शक्ती जागृती चा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बोलतांना सहजयोगी मोहन तांबे म्हणाले प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना ही जगातील 150 पेक्षा जास्त देशात विनामूल्य स्वरूपात व विनसायास चालू असून या ध्यान साधनेचा उपयोग लहान मुला पासून वयोवृधना होत आहे.. या साठी रोज नित्य नियमाने ध्यान केल्यास आपल्याला मनःशांती प्राप्त होते. हिच ध्यान साधना विदयार्थ्यांनी केल्यास त्याच्यात एकाग्रता निर्माण होऊन स्मरणशक्ती वाढते व त्यांची अभ्यासात प्रगती होते.
कार्यक्रम ची सुरुवात गावातील जेष्ठ सदस्य नेटके आबा महाराज यांनी सहजयोग परिवारातील सदस्यांचे स्वागत केले. जिल्हा समन्वयक समन्व्यक श्रीनिवास बोज्जा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सहज अनुभूती जेष्ठ सहजयोगी अंबादास येन्नम यांनी दिली.
सरपंच सुभाष शेळके म्हणाले,सहजयोग ध्यान नित्य नियमाने केल्यास सुख शांती समाधान प्राप्त होते.
सदर सहजयोग ध्यान साधना कार्यक्रम नित्य नियमाने या गावात सुरु करावे असे आवाहन धानोरा गावचे सरपंच सुभाष शेळके यांनी केले. कार्यक्रम शेवटी अंभोरा गाव चे सरपंच सौ. सुवर्णा आमले यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे येथील मनोज तांबे, भक्ती सदरे, पोखरी येथील ज्ञानेश्वर वनवे, श्री खिरे, अहमदनगर येथील शांतीलाल काळे, रावसाहेब सोनार, अभय ठेंगणे, मतकर काका, मेजर बेरड, राहुल सातपुते, रवींद्र आगरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.