स्नेहप्रेममधील मुलींचा सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न! अनेक मान्यवर बनले वऱ्हाडी

कर्जत (प्रतिनिधी) : दि.१२ जून
स्नेहालय अहमदनगर संचालित कर्जत येथील स्नेहप्रेम संस्थेत सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्यात आला.
कर्जत येथील स्नेहप्रेम हे निराधार,निराश्रित आणि आर्थिक परिस्थितीने दुर्बल असणाऱ्या घटकातील मुलांची आणि मुलींची संगोपन करणारी एक सामाजिक संस्था आहे. यात अगदी आठ दहा वर्षाच्या मुलामुलींनपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुले आणि मुलींची सांभाळ करणारी संस्था आहे.याच संस्थेतील एक लहानपणी मातृ आणि पितृछत्र हरपलेली उच्चशिक्षित मुलगी श्रद्धा आणि तिचा जोडीदार संदीप हे देखील उच्च शिक्षित असणारे हे आज सर्व संस्थेच्या बाळगोपाळ आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पाडला.या विवाहासाठी नगराध्यक्षा उषाताई राऊत,माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत,माजी नगरसेविका मानिषाताई सोनमाळी, तुषार काकडे ,प्रा. दीपक लांगोरे, राम ढेरे,सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी नितीन देशमुख,विनोद बोरा यांच्यासह सामाजिक,राजकीय आणि समाजातील सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
स्नेहप्रेम या संस्थेला कर्जत येथील तसेच बाहेरील अनेकजण आपापल्या परीने सहकार्य करतात काही लोक या संस्थेत आपल्या मुलांचे, वडीलधार्याचे वाढदिवस या संस्थेत साजरे करून मिष्टान्न, वस्तू आणि भेट स्वरूपात मदत करित असतात. आतापर्यंत तीन मुलींचे लग्न हे महापुरुषांच्या विचाराने सत्यशोधक पद्धतीने लावले गेल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह फारूक बेग आणि स्वाती ढवळे यांनी सांगितले. आजच्या विवाह सोहळ्यासाठी शिवाजीराव नलवडे यांनी मंगल कार्यालय तर भोजन व्यवस्था उद्योजक रणजित नलवडे यांनी स्वयंपाक मंगेश महाराज यांनी भांडे आणि साहित्य गुडविल इंडिया संस्था पुणे यांच्यासह विविध मान्यवरांनी आपल्या सहकार्याने केला.यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी स्नेहप्रेम संस्थेसाठी दोन गुंठे जागा देण्याचे जाहीर केले.श्रीगोंदा येथील भीमराव कोथिंबीरे यांनी विवाह विधी पार पाडला.यावेळी परदेशातील वृषाली पटवर्धन यांनी कर्जत येथे सर्व सामाजिक संघटना राबवित असलेल्या ‘लेकींचे झाड’यासाठी दोन वृक्षासाठी निधी दिला.