जेष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य समाजासाठी वितरित करावे. -ला. सी ए सुरेश मेहत

अहमदनगर दि.२ मे (प्रतिनिधी) – लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन आणि ज्येष्ठ नागरिक संघ – स्टेशन परिसर, अहमदनगर, यांच्या वतीने ‘आर्थिक साक्षरता आणि इच्छापत्र’ या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल सीए. प्रा. लायन मेहता सुरेश कृष्णदास यांचे व्याख्यान स्टेशन रोड परिसर, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते.
सी ए प्रा. ला. मेहता म्हणाले,
जेष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामाचा अनुभव समाजासाठी कसा करता येईल याचा प्रयत्न करावा. जेष्ठ नागरिकांनी आपलं उर्वरित आयुष्य समाजासाठी वितरित करावे असे आवाहन केले तसेच आपल्या ओघवत्या शैलीने या तांत्रिक विषयाचे अनेक पैलू अतिशय रंजक पद्धतीने मांडून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली .
या वेळी लायन्स मिडटावून चे संस्थापक ला. श्रीकांत मांढरे यांनी क्लब बद्दल माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष के डी खानदेश यांनी त्यांच्या संस्थे बद्दल माहिती दिली. क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.
या कार्यक्रमात लायन्स क्लबच्या सदस्यत्वाची किमान पंचवीस वर्षे पूर्ण केली असलेल्या सदस्यांना सन्मान पत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊनच्या पदाधिकारी राजश्री शितोळे आणि डॉ कल्पना ठुबे यांची अ.नगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक आगरकर यांनी केले स्वागत प्रसाद मांढरे यांनी मानले तर आभार संदिपसिह चौहान यांनी केले.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊनचे माजी रिजन चेअरपर्सन संतोष माणकेश्वर, माजी झोन चेअरपर्सन अँड. रवींद्र शितोळे, माजी अध्यक्ष एमजेएफ अनिल कटारिया, मोहन लुल्ला, संपूर्णा सावंत, राजश्री शितोळे, उपाध्यक्ष अँड सुनंदा तांबे, डॉ. कल्पना ठुबे, संचालिका माधवी मांढरे, मा. नगरसेविका विणा बोज्जा, प्राचार्या शोभा भालसिंग, वंदना निगुट, सुजाता ठुबे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री के डी खानदेशे, सचिव शिवाजी ससे, अशोक आगरकर, सुहास मुळे आणि त्यांचे सहकारीही बहुसंख्येने उपस्थित होते.