उपनगरातील ग्राउंड बाजारात “मटक्याचा बाजार”मटक्याच्या बाजारातच बिंगो अन् “हातभट्टी” पोलीस कधी देणार अवैध धंद्यांना “सुट्टी”!

अहमदनगर दि.१४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) उप नगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच उपनगरे येतात या उपनगरांमध्ये सर्रासपणे मटका, बिंगो ,हातभट्टी, या सारखे अवैध धंदे गुण्यागोविंदाने एकत्र सुरू आहेत.पण पोलिसांची कारवाई शून्यच आहे. का जाणीवपूर्वक या ठिकाणच्या अवैध धंद्यांकडे कानाडोळा केला जातोय का? हा प्रश्नच आहे.
उपनगरात यशोदानगर हे एक उपनगर असून या यशोदानगरच्या जवळच ग्राउंड बाजार या ग्राउंड बाजारातच चालतोय मटक्याचा बाजार या बाजारातच बिंगो अन् हातभट्टी देखील बिनदिक्कतपणे सरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजी बाजार दुपारी चार ते साडेचार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भरलेला असतो.त्यामुळे सहाजिकच यशोदानगर व उप नगरातील नागरिक भाजीपाला घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी चालणाऱ्या मटका,बिंगो, हातभट्टीच्या धंद्यामुळे नागरिकांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत आहे.बिंगोच्या धंद्यामुळे इथे मिनिटाला लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या एकाच ठिकाणी चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होणे स्वभाविकच आहे. यावर पोलीस कारवाई करणार की नाही.याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.पण तूर्तास तरी नागरिकांना उपनगरातील ग्राउंड बाजारात “मटक्याचा बाजार”मटक्याच्या बाजारातच बिंगो अन् “हातभट्टी” पोलीस कधी देणार अवैध धंद्यांना “सुट्टी”! असेच म्हण्याची वेळ आली आहे. (भाग:३)