लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी व जयंतीनिमित्त श्री व्यंकनाथ विद्यालयात वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयाच्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान व मोठ्या गटामधून पाच पाच विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धेसाठी परीक्षकांनी निवडी घोषित केल्या. प्रामुख्याने मोठ्या गटातून शेंडे समीक्षा प्रकाश (प्रथम क्रमांक), कांडेकर ऋतुजा राघू (द्वितीय क्रमांक) तर तृतीय क्रमांक) साळवे प्रणाली कैलास, आणि शेंद्रे गायत्री संतोष तसेच मडके कृष्णप्रेम अंबादास या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले.
तसेच लहान गटामधून :-अनुश्री अमोल जठार (प्रथम क्रमांक), प्रांजल संभाजी उंडे( द्वितीय क्रमांक), निलेश पांडुरंग करे (तृतीय क्रमांक), तेजस्विनी संदीप वागस्कर (चतुर्थ क्रमांक), सोहम किशोर शिंदे व यश सदार या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले. या स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षक आनंदा पुराणे, श्री शिंदे सर, श्रीमती नौशाद शेख, श्रीमती वाबळे यांनी काम पाहिले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे सर यांच्यासह आजी माजी सदस्य तसेच प्राचार्य दत्तात्रय सस्ते व विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.