एकलव्य तायक्वांदो अकॅडमीद्वारे खुल्या एक दिवसीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

केडगाव ( प्रतिनिधी – मनीषा लहारे )
बेलेश्वर कन्स्ट्रक्शनच्या वतीने मुलांसाठी १८ किलो ते ८० किलो च्या पुढील वजन गटामध्ये व मुलींसाठी १६ किलो ते ७५ किलो च्या पुढील वजन गटांमध्ये एकलव्य तायक्वांदो अकॅडमीद्वारे खुल्या एक दिवसीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . महेशभाऊ झोडगे तायक्वांदो चषक २०२२ ‘ ही स्पर्धा रविवारी १३ फेब्रुवारी रोजी लक्ष्मी लॉन , नागरदेवळे , बुऱ्हाणनगर , तालुका नगर , जिल्हा अहमदनगर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक अल्ताफ खान यांनी दिली आहे .
ही स्पर्धा सकाळी ८ वाजता तर बक्षीस समारंभ सायंकाळी ७ वाजता घेण्यात येणार आहे . या स्पर्धेसाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच घेण्यात येणार आहे . जिल्ह्यातील सर्व तायक्वांदो खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा प्रमुख सचिव गणेश वंजारी यांनी केले आहे .
अलिकडे युवापिढीचा मैदानी खेळातील रस कमी होत चाललेला असून मोबाईलच्या माध्यमातून विविध गॅझेटस् त्यांच्या हाती आली आहेत . या पिढीमध्ये आरोग्य व खेळाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची मूल्ये रुजविण्यासाठी एकलव्य तायक्वांदो अॅकॅडमीने युवापिढीसाठी खेळांची संधी उपलब्ध करून देण्याचा महेशभाऊ झोडगे यांच्या अनमोल सहकार्याने हा प्रयत्न केला आहे . या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ७६२०९३१३९५ किंवा ७५१७९९५६०९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे गणेश वंजारी यांनी सांगितले आहे .