समाजाला काय देऊ शकतो, या विचाराने डॉ. शिंदेंचे काम : सपकाळ डॉक्टरेट मिळाल्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

समाजाला काय देऊ शकतो, या विचाराने डॉ. शिंदेंचे काम : सपकाळ
डॉक्टरेट मिळाल्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव
अहमदनगर – समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो, हे विचार आचरणात आणल्यास समाजात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही, हेच काम डॉ. उद्धव शिंदे करत आहेत, असे प्रतिपादन हरदिन मॉर्निंग ग्रुप वतीने संस्थापक अध्यक्ष – संजय सपकाळ यांनी केले.
इन्स्टिटयूट ऑफ एन्टरप्रिन्यूरशिप अँड मॅनॅजमेन्ट स्टडीज ऑटोनॉम्स व्हर्चुअल मोड युनिव्हर्सिटी यांच्याकडून स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना मानद डॉक्टरेट देण्यात आली. यानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रूपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महेश गोंडाळ, प्रकाश गांधी, मारुती पवार, तुषार घाडगे, दीपक शिंदे, मेजर विनोद खोत, अनंत राठोड, संदीप शिंगवी, सागर काबरा उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, डॉ. उद्धव शिंदे यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हे कार्य समोर आलं म्हणूनच त्यांना विविध पुरस्कार मिळाले.