खळबळजनक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या “त्या” विकृत डॉक्टरवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, डॉक्टर सणद रद्द करा : सुमेध गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी आक्रमक पोलीस अधीक्षकांना निवेदन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 23 मे : विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोशल मीडियावर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विकृत डॉ. मंगेश बेकारसे याने अपशब्द वापरल्या प्रकरणी संपूर्ण आंबेडकरी समाजात असंतोष पसरला आहे. अशा विकृत डॉक्टरवर ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करावे व त्याची डॉक्टर ही सणद रद्द करावी अशी मागणी पीप्लस रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
त्यांनी याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी सुमेध गायकवाड , गौतमीताई भिंगारदिवे , सागर ठोकळ , विशाल गायकवाड , किरण गायकवाड , सागर ढगे , दीप भाकरे , अनिकेत विधाते , शांतवणं साळवे , सिद्धार्थ राजगुरु, आदी उपस्थित होते. लवकरात लवकर सदर प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.